परंडा /प्रतिनिधी : -
मुदत संपलेल्या ग्रामपंचायत च्या प्रशासक पदी ग्रामस्थांतुन निवड होणार असल्याचे शासणाने अध्यादेश काढल्याने तालूक्यातील सरपंचात खळबळ उडाली असुन अध्यादेश तात्काळ मागे घेऊन विद्यमान सरपंच कींवा त्यांच्या कुटूंबातील व्यक्तीची प्रशासक म्हणुन नियुक्ती करावी अशी मागणी परंडा तालूका सरपंच संघटणेच्या वतीने दि.१७ जुलै रोजी तहसिलदार यांच्या कडे करण्यात आली आहे.
परंडा तालूक्यात एकुन ७२ ग्रामपंचायत असुन काही ग्रामपंचायत वगळता सर्व ग्राम पंचायत कार्यालयाची सप्टेंबर महिन्यात मुदत संपत आहे. मात्र कोरोना मुळे निवडणुका घेता येत नसल्याने शासणाने अध्यादेश काढून मुदत संपलेल्या ग्रामपंचायत वर प्रशासक नेमण्याचा आधिकार ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला असुन ग्रामपंचायत च्या घटनेत दुरूस्ती केल्याने सरपंच यांना प्रशासक पदी नियुक्ती करता येणार नसल्याने सरपंच यांच्यात खळबळ उडाली आहे.
तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोरोनाचा संसर्ग रोखन्या साठी सरपंच यांचे मोठे योगदान असुन सरपंच यांना डावलुन ईतर व्यक्तीला प्रशासक पदी नियूक्ती केल्यास गावात अशांतता पसरेल या साठी शासणाने निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली आहे .
निवेदनावर ढगपिंपरी चे सरपंच बप्पाजी काळे,बावची चे सरपंच सुभाष थिटे, खानापुर च्या सरपंच अश्विनी गटकुळ ,अदाराचे सरपंच उर्मिला शिंदे, टाकळीच्या सरपंच नर्मदा गरड,खासगाव चे सरपंच बंडू शिंदे ,वडनेर चे सरपंच सोजरबाई खांडेकर, कुक्कडगावचे सरपंच लक्ष्मी साळुंके ,येनेगावचे सरपंच कैलास सोनवणे यांच्या सह तालूक्यातील सरपंच यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.