परंडा / प्रतिनिधी : -
परंडा तालूक्यातील सावदरवाडी येथे दि.१६ जुलै रोजी कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने तालूका प्रशासन सतर्क झाले असुन तालूक्यातील कोरोनाची साखळी तोडण्या साठी तहसिलदार अनिलकुमार हेळकर , तालूका अरोग्य अधिकारी डॉ जहूर  सय्यद , गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर , पोलिस निरिक्षक इकबाल सय्यद यांच्या पथकाने दि. १६ रोजी , सावदरवाडी , जवळा (नि) भांडगाव भागात भेटी देऊन विविध उपाय योजना केली आहे .
या बाबत अधिक माहिती अशी की  सावदरवाडी येथे कोरोना बाधित नवीन रुग्ण आढळल्याने नव्याने प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले व ७३ घरांची आरोग्य सर्वे करण्यात आला तर  जवळा (नि.) येथे विना मास्क फिरणाऱ्या नागरिकावर व क्षमतेपेक्षा जास्त नागरिक असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली यामध्ये आठ प्रकरणांमध्ये २हजार ४००  रुपये दंड वसूल करण्यात आला.
या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्र जवळा येथे वृक्षारोपण करण्यात आले तसेच रुग्णांकरिता व कर्मचारी करीता  सॅनिटायझर मशीन बसविण्यात आली.मौजे भांडगाव मार्ग  बार्शीला जाणाऱ्या मार्गावर  अडथळा निर्माण करून मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.तसेच वाहनावर कारवाई करण्यात आली यामध्ये १० प्रकरणांमध्ये ३ हजार ५००  रुपये दंड वसूल करण्यात आला.शिरसगाव येथील नव्याने उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची पाहणी करण्यात आली.सध्या सोलापूर ,बार्शी हे कोरोणाचे हॉटस्पॉट असल्याने रुग्णांची संख्या परंडा तालुक्यात वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क रहावे  मास्कचा वापर करावा सोशल डिस्टंसिंग ठेवणे  तसेच दिवसातून किमान आठ वेळा साबणाने हात धुणे तसेच विनाकारण घरा बाहेर फिरणे टाळावे व गर्दी करू नये असे आवाहन तालुका प्रशासणाच्या  वतीने करण्यात आले आहे.
परंडा तालुक्यामध्ये सध्या एकूण ४५ रूग्ण  झाले असून त्यापैकी ३२ रुग्णावर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.तर दहा रुग्णावर सध्या कळंब व बार्शी येथे उपचार चालू आहे तीन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
Top