उस्मानाबाद / प्रतिनिधी-
कृषि संजीवनी सप्ताह निमित्ताने वाडी बामणी ता. उस्मानाबाद येथे मंगळवार दिनांक 30 जून 2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेतील लाभार्थीना शेवंगा बिया वाटप करण्यात आल्या.
यावर्षी जिल्हा परिषदेच्या कृषि विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 1 जुलै ते 7 जुलै 2020 या कालावधीमध्ये कृषि संजीवनी सप्ताह साजरा करण्याचे नियोजन केलेले आहे.
 यामध्ये दररोज वेगवेगळया गावात कृषि तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेतील लाभार्थीच्या नवीन विहिरीचे कामे प्रगती पथावर असून या सप्ताहात प्रती लाभार्थी पाच फळझाडे लागवड करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. त्याच बरोबर लाभार्थीच्या बांधावर जाऊन शेवगा बिया वाटपाचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यांची सुरुवात वाडी बामणी ता.जि.उस्मानाबाद येथून करण्यात आलेली आहे. या प्रसंगी प्रत्येक लाभार्थीस 25 शेवगा बिया देऊन लागवड करण्याबाबत जिल्हा कृषि अधिकारी (विघयो) जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी वाडी बामणी येथील सरपंच, योजनेतील लाभार्थी  व ग्रामस्थ उपस्थित होते. हा कार्यक्रम कोरोना नियमाचे पालन करुन संपन्न झाला. उस्मानाबाद पंचायत समितीचे कृषि अधिकारी एस.जे. दराडे यांनी सर्वाचे आभार मानले.

 
Top