तुळजापूर -येथील
हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने तुळजापूर शहरातील  मशिदींवरील भोंगे कायमस्वरूपी बंद करण्याची मागणीचे निवेदन .पोलीस निरीक्षक,तुळजापूर व तहसीलदार तुळजापूर यांना देण्यात आले आहे,
निवदेनात म्हटले आहे की, शहरातील मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ,  वैताळ नगर  येथील मशीदीवरील भोंग्या वरुन दिवसातुन पाच वेळा ध्वनी प्रदूषण होते. ध्वनी प्रदूषण करणे हे कोणत्याही समाजाचा हक्क नसल्यामुळे ते मशीदीवरील भोंग्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण त्वरीत थांबविण्याची मागणी निवेदनात करून महंत मावजीनाथ महाराज, महेश गरड,गिरीश लोहरेकर, दिनेश कापसे,बालाजी जाधव,ओंकार पवार,युवराज शिंदे,विशाल निंबाळकर यांनी या मागणीचे निवेदन  तहसिलदार व पोलिस निरिक्षक यांना दिले आहे.

 
Top