उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
डॉ पंजाबराव देशमुख विद्यार्थी वस्तीगृह, उस्मानाबाद चे व्यवस्थापक व कर्मचारी यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत नागरिकांना Quarantine  करण्याकरता वसतिगृह मध्ये स्वच्छता ठेवणे टॉयलेट  बाथरूम साफ करणे , पिण्याचे पाण्याची व वापरावयाच्या पाण्याची व्यवस्था करणे, लाईट फॅन आदी व्यवस्था करणे अपेक्षित असताना वारंवार बैठकीद्वारे आदेशित करून ही   वस्तीगृहात स्वच्छता न करणे, पाण्याची व्यवस्था न करणे,
इन्स्टिट्यूट क्वारं टाईन साठी प्रशासना कडून  पाठविण्यात आलेल्या Ambulance मधील नागरिकांना,  येथे व्यवस्था नाही तुम्ही दुसरी कडे जावा असे म्हणून माघारी पाठवणे. असे प्रकार वारंवार सुरू होते. या वसतिगृह व्यवस्थापक, कर्मचाऱ्यांनी  त्यांना  सोपवण्यात आले कर्तव्य बजावण्यात कुचराई केली तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत करण्यात येणारे कामामध्ये अडथळा निर्माण केला आहे.त्यामुळे सदर वस्तीग्रह व्यवस्थापक श्री रामदास माने व इतर दोन शिपाई यांचे विरुद्ध उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यांमध्ये तहसिलदार उस्मानाबाद यांनी गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे हे वसतिगृह शासनाच्या वतीने चालवण्यात येतात. या वसतिगृहावर महसूल प्रशासनाचे नियंत्रण आहे.
 
Top