उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
भूम तालुक्यातील गोलेगाव येथील क्वारंटाईन कक्षात क्वारंटाईन केलेले असतानाही कक्ष सोडून बाहेर जाणाऱ्या एका डॉक्टरसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी मध्यरात्रीनंतर घडला.
बाधितांच्या संपर्कात आल्याने डॉ. विशाल जगदेवराव सपकाळ, राजेश गायकवाड (दोघे रा. भुम) यांना गोलेगाव येथे क्वारंटाईन करण्यात येउन त्यांच्या घशातील लाळेचा नमुना (स्वॅब) कोविड परिक्षणास पाठवण्यात आला होता. तो परिक्षण अहवाल प्राप्त होईपर्यंत त्यांनी क्वारंटाईन गृहात राहणे बंधनकारक आहे. या बाबत त्यांना सरकारी वैद्यकीय अधिकारी- कर्मचारी यांनी आदेशीत केले होते. तरीही त्या दोघांनी मध्यरात्री विनापरवाना क्वारंटाईन गृह सोडून निघुन गेले. यावरुन ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप जोगदंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
Top