उस्मानाबाद / प्रतिनिधी-
केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने महिलांसाठी स्वाधार व उज्वला या योजना राबविण्यात येतात. उज्वला व स्वाधार सुधारीत योजनेअंतर्गंत उस्मानाबाद जिल्ह्यासाठी  प्रस्ताव सादर करण्यासाठी दैनिक संघर्ष उस्मानाबाद या वृत्तपत्रात दि. 20 जुलै 2020 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. या जाहिरातीमध्ये प्रस्ताव सादर करण्यासाठी दि.31 जुलै, 2020 ही अंतिम मुदत देण्यात आली होती.
 सध्या कोविड 19 ची साथ मोठयाप्रमाणावर सुरु आहे. या साथरोगाच्या प्रसाराचे गांर्भीय लक्षात घेऊन प्रशासनाने  अनेक ठिकाणी लॉकडाउन, संचारबंदी लागू केलेला असल्यामुळे इच्छूक संस्थाना प्रस्तावासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे प्राप्त करण्यासाठी येत असलेल्या अडचणींचा विचार करुन उज्वला व स्वाधार योजनांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी दि. 24 ऑगस्ट, 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. प्रस्तावासंबधित इतर अटी व शर्ती जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे कायम आहेत. इच्छुक संस्थानी याची नोंद घ्यावी व उज्वला व स्वाधार योजनांचे प्रस्ताव दि. 24 ऑगस्ट, 2020 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सादर करावेत, असे आवाहन बी. एच. निपाणीकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.

 
Top