उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना महामारीने देश ,राज्य व जिल्ह्याजिल्ह्यात देखील अक्षरशः हाहाकार माजविला असून हातावर पोट असलेले मजूर ,कष्टकरी ,श्रमजीवी यांचा रोजगार संपुष्टात आल्याने कोरूना नव्हे तर भूकबळीने मरण्याची भीती या गोरगरीब सर्वसामान्य वर्गाला सतावत असल्याचे स्पष्ट मत जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते अॅड रेवण भोसले यांनी व्यक्त केले आहे.
    कोरोना ,सततचा लॉकडाऊन व निसर्गाचा लहरीपणामुळे सर्वसामान्य पुरते मेटाकुटीला आले आहेत. या काळात अनेक बडे उद्योगधंदे कंपन्यांनी कामगार व मजूर कपातीचे धोरण अवलंबिले असल्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती झाली आहे. अनेकांच्या चुली विझल्या आहेत. सरकारने आता अन्नधान्य पुरवणे गरजेचे झाले आहे. ग्रामीण भागात कोरोनाची दहशत मोठी आहे .त्यामुळे लोक सतर्क राहून स्वतः काळजी घेत असल्यामुळे आता पुन्हा पुन्हा लाॅगडाऊनची गरज उरलेली नाही. कोरोना महामारीच्या अनुषंगाने लाॅक डाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी देखील कोरुणा संसर्गाची आकडेवारी कमी होताना दिसत नाही. कोरुना रुग्णसंख्या कमी करण्यास प्रशासन अपयशी ठरत आहे. कोरोना पेक्षा आर्थिक संकट व हतबलतेने नागरिक आधीच त्रस्त आहेत. उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने जगायचं कसं असा प्रश्न निर्माण झाला आहे .लाॅक डाऊनमुळे संपूर्ण बाजारपेठेवर परिणाम झाला असून दुकानात काम करणारे अनेक कर्मचारी गावी निघून गेले आहेत  ,जे आहेत त्यांच्या आर्थिक परिस्थिती अत्यंत खराब आहे. करुणा रुग्णसंख्या सगळीकडे वाढत आहे. त्यामुळे ठिक ठिकाणी लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले आहे .या लॉकडाउनचा फायदा घेत काही पोलीस कर्मचारी हे व्यवसायिकांना ,नागरिकांना ,अत्यावश्यक सेवेतील लोकांना अडवून अर्वाच्च भाषा वापरून कायद्याची भीती दाखवत नाहक त्रास देताहेत. राज्य शासनाने स्थानिक प्रशासनाला अमर्याद अधिकार बहाल केल्यामुळे जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त मनमानी ,वाटेल ते आदेश काढून सर्वसामान्यांना त्रास देत आहेत .त्यामुळे आता सरकारने लॉकडाउन वाढविण्यापेक्षा गोरगरिबांना धान्यपुरवठा
 करण्यावर भर द्यावा.’ पुनश्च हरिओम’ म्हणणाऱ्या सरकारने ‘पुनश्च लाॅकडाऊन’ जाहीर करीत सर्व व्यवहारांना प्रतिबंध लावला आहे. त्यामुळे कोट्यवधींना बेरोजगार व्हावे लागले ,लाखो लोकांनी केलेली पायपीट सार्‍या जगाने पाहिली, अनेकावर कोरूनाने नव्हे तर उपासमारीने जीव जाण्याची वेळ आली .त्यामुळे आता जिल्हाबंदीसह संपूर्ण लॉकडाऊन उठवणे हाच सरकार समोर पर्याय असल्याचे स्पष्ट मतही अॅड भोसले यांनी व्यक्त केले.

 
Top