तुळजापूर/प्रतिनिधी-
येथील श्री तुळजाभवानी मंदिरा मधील ऐका  सुरक्षारक्षकाचा  एक  महिन्यापूर्वी अपघाती निधन झाले होते त्याचा कुंटुंबास श्री तुळजाभवानी मंदीरातील सुरक्षा स्वछता कर्मचाऱ्यांनी एकञ येवुन त्यांच्या कुंटुबियास वर्षभर पुरेल इतके  अन्नधान्य व रोख रक्कम देवुन मदतीचा हात दिला.
सदरील मयत झालेल्या त्यांच्या कुटुंबावर दुःखाची कुऱ्हाड कोसळली आहे संपूर्ण कुटुंब हे त्यांच्यावरच  अवलंबून होते घरामध्ये त्यांचे वडील आजारी असतात त्यांच्या आई उदरनिर्वाहासाठी शेतात कामाला जाते त्यांच्या पश्चात,आई-वडील, भाऊ ,त्यांच्या पत्नी व दोन लहान मुले  आहेत . ते तुळजाभवानी मंदीरात गेली अनेक वर्षांपासून सुरक्षारक्षक म्हणून  कार्यरत होते या कुंटुबाला कुणीही मदतीचा हात दिला नव्हता अखेर एककाळचे त्याचे गरीब वर्गातील सहकारी धावुन येवुन. दोन क्विंटल गहू , दोन क्विंटल तांदूळ , एक क्विंटल ज्वारी, एक तेलाचा डबा,, शेंगदाणे साखर, तूर डाळ ,हरभरा डाळ, कपड्याचे साबण, अंगाचे साबण, तेल पॉकेट, हळद, मीठ, मिरची पावडर इत्यादी जीवनावश्यक वस्तू व पाच हजार रुपये मदत स्वच्छता व सुरक्षा विभाग राष्ट्रीय श्रमिक कामगार संघटना ने करुन माणुसकिचे दर्शन घडवले.
 
Top