तुळजापूर / प्रतिनिधी-
तालुक्यातील बोरमन तांडा येथे हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जंयतीनिमित्त व कृषी दिनानिमित्त संपूर्ण गावात शेतकरी व शेतमजूर यांना सँनिटायझरचे वाटप जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण व तुळजाभवानी कारखान्याचे संचालक अशोक पाटील यांच्या वतीने करण्यात आले.
यावेळी तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष गोविंद चुंगे, राजु चव्हाण, भिमा राठोड, सुभाष राठोड, मोहन राठोड, मोहन चव्हाण ,विनायक चव्हाण, संजय राठोड, गोपा राठोड, प्रेमनाथ चव्हाण, संजय चव्हाण, बाबु चव्हाण, शाम राठोड, राजु राठोड, राजेंद्र राठोड,श्रीशल दरेकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
 
Top