उस्मानाबाद/प्रतिनिधी
महाराष्ट्रातील पुणे, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात तसेच कर्नाटकात लुटमारी, खून करणारा कळंब तालुक्यातील ईटकूर पारधी पेढी येथील आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे.रामा कल्याण काळे उर्फ रामेश्वर, वय (५५,वर्षे),असे त्याचे नाव अाहे.
पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, अपर पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांनी गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींविरूध्द शोध मोहीम उघडली आहे. त्या अनुषंगाने बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक फरारी आरोपींच्या शोधासाठी कळंब तालुक्यात गस्त करत होते. दरम्यान पथकास कन्हेरवाडी पाटीजवळ एक व्यक्ती संशयीतरित्या फिरताना आढळला. पथकाची चाहुल लागताच तो पळू लागल्याने पोलीसांनी त्यास पकडून विचारपुस केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीसांनी त्यास ताब्यात घेउन त्याच्या पुर्व इतिहासाची पडताळणी केली असता त्याचे त्याच्यावर उस्मानाबाद जिल्ह्यात १, बीड जिल्ह्यात १, पुणे जिल्ह्यात ५, कर्नाटक राज्यात ५ चोरी-लुटमारीचे असे एकुण १२ गुन्हे दाखल आहेत. पोलीसांनी त्याच्याविरुध्द म.पो.का. कलम १२२ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यास पुढील कारवाईसाठी कळंब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. बीड जिल्ह्यातील केज पोलिसांच्या हद्दीत मंदीरातील चोरी करताना खून केलेल्या गुन्ह्यात त्यास केज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि पांडुरंग माने, पोहेकॉ जगताप, प्रमोद थोरात, पोना हुसेन सय्यद, विजय घुगे यांच्या पथकाने केली आहे.
 
Top