उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
 कोरोनात प्रशासनाने काढलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिस दलातील १८ पोलिस ठाण्यातील व इतर शाखांमार्फत बुधवारी (दि.८) मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाया करण्यात आल्या. यामध्ये १३४ पोलिस कारवायांत ३० हजार ४०० रुपयांचा दंड जिल्हाधिकाऱ्यांच्या केला आहे.
सार्वजनिक स्थळी थुंकल्यामुळे १०४ कारवाया करून २० हजार ८०० रुपयांचा दंड केला. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यामुळे ४ कारवाया करून २ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखल्याने सोशल डिस्टन्सींग टाळुन दुकानासमोर गर्दी निर्माण केलल्यामुळे ५ कारवाया करून एक हजार रुपयांचा दंड केला आहे. कार- मोटारसायकलवर जादा प्रवासी बसून लॉकडाऊन काळात मोटारवाहनांतील प्रवासी मर्यादेचे उल्लंघन केल्या प्रकरणी २१ कारवाया करून ६ हजार ६०० रुपयांचा दंड केला आहे. कोरोना काळात नियम न पाळणाऱ्या वाहनधारकांवर जोरदार कारवाया सुरू आहेत.
 
Top