उस्मानाबाद/प्रतिनिधी 
उस्मानाबाद शहरात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपा मुधाेळ-मंुडे यांनी १३ ते १९ जुलैदरम्यान संचारबंदी जाहीर केली आहे. यासंबंधीचे आदेश गुरूवारी रात्री काढण्यात आले आहेत. दरम्यान, संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
नगर पालिकेने बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरात वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ७ दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच म्हणजे गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू करण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार १३ जुलैपासून ही संचारबंदी असेल. या काळात दूध, किराणा, औषध दुकाने, दवाखाने सुरू राहतील. तसेच बँका, शासकीय कार्यालय, सर्व बांधकामे, पाणी वितरण विभाग, घरगुती गॅस, सर्व प्रकारची मालवाहतूक सुरू राहील. औद्योगिक वसाहत कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्याची जबाबदारी संबधीत कारखान्याची राहील. भाजीपाला विक्रीसाठी परवानगी असेल तर सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत पेट्रोल पंप सुरू राहतील, असे कळविण्यात आले आहे. दरम्यान, बुधवारी रात्री उिशरा आलेल्या रिपोर्टनुसार उस्मानाबाद शहरात झोरी गल्लीत अजून ७ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच नाना दूध डेअरीजवळ काळात मारुती चौक परिसरात नवीन रुग्ण आढळून आल्याने गुरूवारी हा परिसर सील करण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशिरा जिल्ह्यातील २० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात १० उमरगा तालुक्यातील रुग्ण आहेत.उमरगा शहरात ५, दाळींब २, बेडगा व तलमोड प्रत्येकी १ तर परंडा तालुक्यातील आवारपिंप्री व धोत्रीतील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता वाढत आहे.

 
Top