उस्मानाबाद/ प्रतिनिधी
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी रविवार, दि. 28 जून, 2020 पासून दर रविवारी उस्मानाबाद आकाशवाणी वरील कोरोना निर्मूलन दक्ष कार्यक्रमात संवाद साधत आहेत. याचा लाभ सर्व उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
दि. 28 जून, 2020 रोजी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी शाळा सुरु करण्याबाबत मार्गदर्शन केले आहेत. यामध्ये दीक्षा ॲप डाऊनलोड करुन ऑनलाईन शिक्षणाचा अवलंब करण्याच्या सूचना दिल्या. तसेच ज्या गावांमध्ये शाळा कंटेनमेंट झोनमध्ये नाहीत त्या शाळा सुरु होणार आहेत. त्याच्या अनुषंगाने ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी सध्या शाळा सुरु होणार नाही. या सर्व गोष्टीची काळजी घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.

 
Top