उस्मानाबाद/ प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दि. 1 जुलै  ते 7 जुलै, 2020 या दरम्यान कृषि सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत खरीप हंगाम 2020 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीकोनातून कृषि विभागाचे क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी, कृषि विभाग, जिल्हा परीषद, कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, आत्मा, पोक्रा, कृषि मित्र यांच्यामार्फत गावनिहाय शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना कृषि, कृषि सलग्न विभागांच्या योजनांबाबत मार्गदर्शन करणार आहेत.सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

 
Top