उस्मानाबाद /प्रतिनिधी-
कळंब शहरातील भाटसांगवी रस्त्यावरील हॉटेल न्यू शिवनेरी येथे कळंब पोलिसांनी कारवाई करून अवैधरीत्या विक्री होत असलेल्या ९८ देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. कळंब पोलिस शहरात गस्त घालत असताना सदरील हॉटेलवर अवैध मद्यविक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार छापा टाकला असता अजित बंडू कोल्हे (रा. भाटसांगवी) हा अवैधरीत्या दारूविक्री करताना आढळून आला. यावेळी देशी दारूच्या ८७ तर विदेशी दारुच्या ११ बाटल्या असा एकूण ७,६७४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी कळंब ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

 
Top