उस्मानाबाद /प्रतिनिधी -
आज दहावीचा निकाल जाहिर झाला असून यंदा उस्मानाबाद जिह्याचा निकाल 94.25 टक्के एवढा लागला आहे. जिह्यात एकूण 21 हजार 968 विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली होती त्यातील 20 हजार 704 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
राज्यातील दहावीचा निकाल आज जाहिर झाला आहे. उस्मानाबाद जिह्याचा निकाल 94.25 टक्के लागला असून 20 हजार 704 विद्यार्थी ही परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 7 हजार 969 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह 7 हजार 52 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 4 हजार 527 विद्यार्थी द्वितीय श्रेणी तर 1 हजार 156 विद्यार्थी तृतीय श्रेणीत पास झाले आहेत.
यावर्षीही मुलांपेक्षा मुलीचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे. यावर्षी मुलांचा निकाल 92.10 टक्के असून मुलींचा निकाल 96.64 टक्के एवढा लागला आहे.
 
Top