उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जिल्हा वार्षिक योजना (अजाघका) या योजनेतून अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना सिंगल फेजवर चालणारी पिठाची गिरणी पुरवठा करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना 90 टक्के प्रमाणे अनुदान मंजूर करण्यात येणार आहे. तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना शिलाई कम पिको-फॉल मशीन पुरवठा करण्यासाठी पात्र लाभार्थ्याना 90 टक्के प्रमाणे अनुदान मंजूर करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद स्वंसपादित उत्पन्नातील योजनेतून सर्वसाधारण मुली, महिलांना एम.एस.सी.आय.टी.(MSCT) प्रशिक्षण देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना 90 टक्के प्रमाणे अनुदान मंजुर करणे. तसेच सर्वसाधारण मुलींना 5 वी ते 12 पर्यंत शिक्षण घेत असलेल्या मुलींना सायकल देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना 90 टक्के प्रमाणे अनुदान मंजूर करणे. सर्वसाधारण मुली, महिलांना ब्युटी पार्लर प्रशिक्षण देण्यासाठी पात्र लाभार्थ्याना 90 टक्के प्रमाणे अनुदान मंजूर करण्यात येणार आहे.
वरील योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थीनी विहित नमुन्यातील अर्ज तालुकास्तरावील बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रा.) व गावपातळीवर अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्याशी संपर्क साधून दिनांक 15 ऑगस्ट, 2020 पर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रा.), एकात्मिक बाल विकास सेवा योजना या कार्यालयास अर्ज सादर करावे, असे आवाहन बी. एच. निपणीकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबावि), जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी केले आहे.