उस्मानाबाद/ प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊनचा कालावधी  दि.31 जुलै 2020 पर्यंत वाढविला आहे. या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने आदेशामध्ये नमूद केल्यानुसार  अन्य कोणत्याही  विशिष्ट, सर्वसाधारण आदेशानुसार परवानगी दिलेल्या बाबी परवानगी आदेशात नमूद केलेल्या अटी व शर्तीसह चालू राहतील, असे नमूद  केले आहे. या आदेशान्वये  परवानगी  दिलेल्या  बाबी परवानगी आदेशात नमूद केलेल्या अटी व शर्तीसह चालू आहेत.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांना प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार यापूर्वी दिलेल्या आदेशातील मुद्दा क्र.(5)(V) (h)मध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करीत आहे. रेस्टॉरंन्टमध्ये फक्त स्वयंपायकगृह चालू  ठेवून अन्न पदार्थाची  घरपोच सेवा (होम डिलीव्हरी) देण्यास सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत परवानगी राहील.  या आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या  दिनांकापासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.

 
Top