तुळजापूर  / प्रतिनिधी-
तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे हंणदारी मुक्त गाव उपक्रम अंतर्गत गावातील मुख्य रस्ता असलेल्या अंबिकानगर ते काटगाव या रस्ता व भागात घरोघरी शौचालय उभारणीस प्रोत्साहन देवुन या भागात असणारे दोन सार्वजनिक   शौचालय हलविण्यात आले आहे. काटगाव हंगणदारी मुक्त करण्याचा संकल्प लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशध्यक्ष  सोमनाथ कांबळे यांनी केला असुन आज पर्यत दोन भाग हंगणदारी मुक्त केले असुन उर्वरीत गाव हंगणदारी मुक्तीचे काम सुरु आहे.
या उपक्रम साठी सरपंच नगिनाताई सोमनाथ कांबळे  उपसरपंच अशोक माळी ग्रामपंचायत सदस्य बळीराम चेंडके दत्ता वाघमारे मुकेश शिवशिंगवाले रेणुका रोकडे रईस शेख ग्रामपंचायत कर्मचारी इरफान शेख अशोक माळी प्रशांत मुळे नागनाथ बेटकर ग्रामसेवक भिमराव झाडे हे परिश्रम घेत आहेत यांना आशा कार्यकत्या लक्ष्मी सोनटके अलका माळी योगीता माळी भाग्यश्री हजारे राणी कोरे मुल्लीनाथ कांबळे अंगणवाडी मदतानीस जयश्री बेटकर भाग्यश्री भुशेट्टी तसेच प्रतिष्ठात पंडीत जोकार निवृत्ती म्हेञे चनवीस बेटकर कचरु पठाण रामदास चेंडके बालाजी ईरागोटे नवनाथ कांबळे महेश माळी जावेद शेख बळीराम माळी बाबासाहेब माळी बजरंग देडे भिमराव गायकवाड सह  हरणाई सामाजिक संस्था पदाधिकारी सहकार्य करीत आहे.

 
Top