उस्मानाबाद /प्रतिनिधी-
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमार्फत LOS प्रणालीद्वारे पीक कर्जाचे वितरण करण्यास अडचण येत असल्याने विना LOS प्रणालीद्वारे पीक कर्जाच्या वितरणाची परवानगी देण्यात यावी - खासदार ओमराजे निंबाळकर
उस्मानाबादजिल्ह्यात पावसाळ्यामुळे शेतकरी खरिप हंगामाच्या पेरणीच्या कामात व्यस्त आहेत. खरिप पेरणीसाठी बँकांकडून बियाणे व खतांच्या खरेदीसाठी पीक कर्जाचे त्वरित वितरण करण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. परंतु पीक कर्ज वितरण करताना आपल्या स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमार्फत कर्ज उत्पत्ती प्रणालीद्वारे केले जात आहे.  यामुळे प्रतिदिवस केवळ 20 ते 25 शेतकर्‍यांना पीक कर्जाचा लाभ मिळत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज मिळते. विना LOS प्रणालीद्वारे पीक कर्जाच्या वितरणाची मागणी शेतकऱ्यांन कडून केली जात आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमार्फत विना LOS प्रणालीद्वारे पीक कर्जाच्या वितरणाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर साहेब यांनी जनरल मॅनेजर, स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई यांच्या कडे ईमेलद्वारे केले आहे.

 
Top