तुळजापूर /प्रतिनिधी-
तालुक्यातील ऐकवीस गावातील 145 शेतक-यांनी आपल्या शेतात पेरलेले नामांकित कंपनीचे सोयाबीन चे  बियाणे न उगवल्याच्या तक्रारी दिल्या या अनुषंगाने 70 शेतक-यांनी केलेल्या तक्रारी चे पंचनामे समितीने केले असुन उर्वरीत पंचनामे दोन दिवसात  पुर्ण होणार असल्याची माहीती पंचायत समितीचे कृषी अधिकारी पिंपरकर यांनी दिली.
आधीच कोरोना मुळे अर्थिक  संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शाषणाने कुठलीही अर्थिक मदत केली उसनेपासने करुन कर्ज काढुन काळ्या आईची ओटी भरली होते माञ नामंकित कंपनीचे पेरलेले  बियाणे उगवलेच नसल्यामुळे शेतकऱ्यांनी
कृषी कार्यालयात धाव घेतली असता कृषी अधिकारी यांनी रितसर कागदपञा  तक्रारी करण्याचा सुचना केल्या त्या अनुषंगाने तालुक्यातील 142शेतक-यांनी तक्रारी केल्या या तक्रारी ची दखल घेवुन  तक्रार निवारणा समितीचे सदस्य यांनी आजपर्यत 70शेतक-यांचा शेतात जावुनपंचनामे केले यात कोळेकर गुट्टे कृषी अधिकारी गायकवाड कृषी अधिकारी पिंपरकर अदिंचा समावेश होता.
महाबीज 52 ग्रीन गोल्ड,  75 गावकी, 21 संकल्प, 3 वरदान,  5 यशोदा , 1 कल्पवृक्ष , 3 हिरामोती , 2 कृषीधन  अदि कंपनीच्या बियाणांचा समावेश आहे.

 
Top