उस्मानाबाद/ प्रतिनिधी
सन 2018-19 व 2019-20 या वर्षांमध्ये जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात पाणलोट क्षेत्र विकसित करण्यासाठी सुजलाम सुफलाम उस्मानाबाद मोहिमेअंतर्गत पाणलोटात काम करणाऱ्या विविध संस्था, प्रशासकीय यंत्रणा व लोकसहभागातून पाणलोटाची 828 इतके कामे पूर्ण केली.
मागील दोन वर्षात उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने जिल्हा सुजलाम-सुफलाम करण्यासाठी पाणलोट क्षेत्र विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जवळपास 828 कामे पूर्ण केली. या कामातून 6 हजार 693 टीसीएम एवढा पाणीसाठा निर्माण केला. या अतिरिक्त निर्माण केलेल्या पाणी साठ्यातून 2 हजार 677 हेक्टर एवढे क्षेत्र ओलिताखाली आले आहे.  उस्मानाबाद जिल्ह्याने राबवलेले सुजलाम-सुफलाम ह्या अभियानाची दखल देशपातळीवर घेण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्कोच ऑर्डर ऑफ मेरिट अवार्ड  देऊन उस्मानाबाद जिल्ह्याचा गौरव करण्यात आला आहे. या गौरवपूर्ण कामगिरीसाठी उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे व त्यांच्या टीमने अतिशय नियोजनबद्ध सुजलाम-सुफलाम मोहीम जिल्ह्यात राबवून पाणलोट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
  स्कोच संस्थेमार्फत यावर्षी देशपातळीवर निवडलेल्या 115  जिल्ह्यांमध्ये उस्मानाबाद चा समावेश होतो. मागील दोन वर्षात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वांगीण विकासाकरता प्रयत्न केले जात आहेत.  स्कोच  या संस्थेकडून दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण योजनेला skoch हा award दिला जातो.  या सुजलाम-सुफलाम मोहीमचा राष्ट्रीय स्तरावर टॉप प्रोजेक्ट मध्ये समावेश झाला असून त्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्याला  स्कोच ऑर्डर ऑफ मेरिट हा अवॉर्ड मिळाला आहे.
 
Top