तुळजापूर / प्रतिनिधी
तालुक्यातील मुबई रिर्टन माळुंब्रा येथील कोरोना बाधीत पंचावन्न वर्षीय महिला अखेर उपचार चालु असताना उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयत सोमवार दि 22रोजि दुपारी बारा वाजता मरण पावली .
या महिलेचा निधनाने तुळजापूर तालुक्यात हा कोरोना चा पहिला बळी ठरला. सदरील महिलेचा मुलगा ही कोरोना बाधीत असल्याचे समजते. सदरील मयत महिला मुंबई येथुन खाजगी वाहनांनी आपल्या मुलासह गावी आली होती ही पंचावन वर्षिय महिला क्वारटांईन साठी शेतात राहिली माञ ताप येताच तिला तुळजापूर येथील उपजिल्हारुग्णालय कोविड 19रुग्णालयात आणले असता तिथे तिची तपासणी केली असता ती कोरोना बाधीत निघाली या महिलेचा संपर्क तील सोळा जणांना क्वारटांईन केले होते त्यापैकी ऐकास कोरोनाची लागण झाली होती.
कोरोना शुगर बीपी ञास यामुळे सदरील महिलेचा मुत्यु झाल्याची माहीती जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डा़ँ गलांडे यांनी दिली.
 
Top