कळंब /प्रतिनिधी
दि. 11 जून रोजी मध्यरात्री आणि 12 जून रोजी दुपारी पावसाचे कळंब तालुक्यात आगमन झाल्याने कोरोना च्या चर्चेला पूर्ण विराम देत, बळीराजाने पेरणीसाठी बियाणे आणि खताची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी केली असून कांहीही संकट आले तरी काळ्या आईचे ओटी भरण्यासाठी बळीराजा सज्ज झाला आहे, दोन दिवसाच्या समाधानकारक पावसाने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, मांजरा नदीच्या उपनद्या यंदा पहिल्याच पावसात प्रवाहित झाल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, लॉकडाऊन मुळे फळवर्गीय पिके आणि भाजीपाला याचे मोठे नुकसान झाल्याने मोठे आर्थिक संकट समोर उभे टाकले होते.
सर्व संकटावर मात करत पुन्हा एकदा या वर्षी खरीप पेरणीस बळीराजा तयार झाला आहे,  भूकंप, दुष्काळ, पूर, बाजारपेठेतील परवड आशा अंनत अडचणी पार करत साऱ्या जगाच उदर भरन शेतकरी करतो.
 
Top