उस्मानाबाद/प्रतिनिधी
कोरोना आजाराने सबंध जगभरात हाहाकार उडवून दिलेला आहे.आपल्या देशात सुद्धा गेल्या तिन महिन्यांपासून शाळा,महाविद्यालये बंद आहेत.परिणामी अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.अनेक विद्यार्थी बिकट आर्थीक परिस्थिती मुळे  अत्यंत गरज असतानासुद्धा ,इच्छा असूनही अॉनलाईन क्लासेस लावू शकत नाहीत.हीच अडचण लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता प्रशिक्षण विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुशील शेळके यांनी आपल्या वाढदिवसानिमीत्त (१ जूलै)इतर सामाजिक उपक्रमांवरील खर्च टाळून गरीब व होतकरु विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात कोचींग क्लासेसची सोय उपलब्ध करुन देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे.सदरील क्लासेसमधे विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्षभराची फक्त १०% फीस भरायची आहे तर उर्वरीत ९०% फीस प्रा.सुशील शेळके हे भरणार आहेत. आत्महात्याग्रस्त कुटुंबातील पाल्यांना सदरील क्लासेसमधे मोफत प्रवेश दिला जाईल.
हे क्लासेस यावर्षी इ.८वी,इ.९वी,इ.१० वी व इ.११ वी मधील उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरिता असतील.क्लासेसमधे इ.११वी  सायन्स मधील  फिजीक्स,केमेस्ट्री,मॕथेमॕटीक्स व बायोलॉजी या विषयांचा समावेश असेल तर इ.८ वी, ९ वी व १० वी सेमी इंग्रजी माध्यमातील  विद्यार्थ्यांकरिता मॕथेमॕटीक्स व सायन्स  या विषयांचे  वर्षभर अॉनलाईन  क्लासेस घेतले जातील.
सदरील क्लासेस साठी स्वतंत्र व सर्व सोयींनीयुक्त ऑप विकसीत केलेले आहे.  सदरील क्लासेसचे अॉनलाईन  उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते श्री जीवनराव गोरे यांच्या शुभहस्ते होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी  राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता सेलचे प्रदेशाध्यक्ष मा.प्रदीपदादा सोळुंके हे असणार आहेत तर या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिक्षक आमदार श्री विक्रम काळे यांची उपस्थिती लाभणार आहे. तर उस्मानाबाद  जिल्हाध्यक्ष श्री सुरेश बिराजदार,मा.आ.राहूल मोटे ,विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री संजय निंबाळकर,डॉ.प्रतापसिंह पाटील,श्री महेंद्र धुरगुडे, श्री नितीनजी बागल,सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री व्ही.एन.शेळके, डॉ.संजय कांबळे,डॉ.बाळकृष्ण भवर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
दि.१ जूलै २०२० रोजी सकाळी १०.१० वा. अॉनलाईन उद्घाटन होणार आहे. दि.१ जूलै पासून सदरील क्लासेस सुरु होणार आहेत तर प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. प्रवेश घेण्याचा अंतीम दिनांक  ५ जुलै असून क्लासेसमधे प्रवेश घेण्यासाठी व अधीक माहितीसाठी विद्यार्थींनी 9011218092 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 
Top