तुळजापुर/प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील तडवळा येथील बायपास  सर्विस रस्ता व काक्रंबा येथील बोगदा काम प्रकरणी दोन्ही गावचा ग्रामस्थांन मध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याने सर्विस रस्ता व बोगदा कामा बाबतील तेथील ग्रामस्थांनी खासदार आमदार कडे आपल्या व्यस्था सांगून हे कामे सोयीसाठी केले जावेत अशी मागणी होत आहे.
तडवळा येथील गावाजवळ सर्विस रस्ता न करण्याची भूमिका ठेकेदाराने घेतल्याने याचा सर्वाधिक ञास या भागातील शेतकरी व तडवळा ग्रामवासियांना होणार असल्याने या भागातील ग्रामस्थांनी खासदार ओमराजे निंबाळकर  यांना तडवळा येथे आणुन आपली समस्या सांगुन सर्विस रस्ता करण्या सुचना देवुन सर्विस रस्ता काम न केल्यास  स्वता आंदोलन करेन अशा स्पष्ट शब्दात हायवे ठेकेदारास बजावले.
तर दुस-या तालुक्यातील काक्रंबा या गावातील ग्रामस्थांनी नविन हायवेच्या पुला खाली होत असलेला बोगदा हा चुकीची ठिकाणी होत असून ती  जागा बदलुन योग्य ठिकाणी व्हावा या साठी आमदार  श्री राणाजगजितसिंहजी पाटील साहेब  यांच्याकडे मागणी केली आहे, याच अनुषंगाने आमदार साहेबांच्या सुचनेनुसार आज जिल्हा परिषदच्या अध्यक्षा सौ.अस्मिताताई कांबळे, तुळजापुरचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी, आनंद  कंदले यांनी गावचे सरपंच, सदस्य व ग्रामस्थांशी काक्रंबा येथे जाऊन चर्चा केली, या विषयी आमदार साहेब लवकरच संबंधित हायवे अधिकारी यांच्या सोबत बैठक करुन हा प्रश्न मार्गी लागतील असे सांगीतले, तसेच हा बोगदाचा प्रश्न मिटे पर्यंत काम थांबवावे असे येथील काम करत असलेल्या कर्मचारी यांना सांगीतले..

 
Top