काटी/प्रतिनिधी-
 तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या परिसरातील महिलांनी यंदाची वटसावित्री पोर्णिमा वडाच्या झाडाजवळ गर्दी झाली तर कायदेशीर उल्लंघन होईल आणि आपल्या कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात येईल या भावनेतून  लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सौ. नंदा श्रीहरी ढगे यांच्या घरी एका कागदावर वडाच्या झाडाचे चित्र रेखाटून शेजारील महिलांसह त्याचे पुजन करून वटसावित्री पौर्णिमा घरच्या घरीच साजरी केली. दरवर्षी वटसावित्री दिवशी सुवासिनी महिला सौभाग्यलंकार परिधान करून वडाच्या झाडाची पुजा करुन आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्याची प्रथा आहे.
यंदा देशासह राज्यात लॉकडाऊन असून कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महिलांनी घरच्या घरीच वटसावित्री पौर्णिमा साजरी करून प्रशासनाला सहकार्य करण्याचा निर्णय घेऊन सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत कागदावर रेखाटलेल्या वडाच्या झाडाचे पुजा करुन झाडास दोऱ्यासह सात फेरे मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत वटसावित्री पौर्णिमा साधेपणाने साजरी करून घरीच राहा सुरक्षित राहा असा संदेश दिला.
या उत्सवात सौ. नंदा श्रीहरी ढगे, सौ. हेमा सागर ढगे, सौ. सुवर्णा सचिन गवळी, सौ. निता नारायण ढगे, सौ. गंगाबाई तुळशिराम ढगे,  सौ. विमल बाळासाहेब भड, सौ. महादेवी नेताजी थिटे, सौ.पोर्णिमा शाम ढगे, सौ. बेबी दत्तात्रय ढगे आदी महिलांनी सहभाग नोंदवला होता.

 
Top