उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 दि.05 जून 2020 जागतिक पर्यावरण दिन निमित्त मौजे जुनोनी ता.व जि.उस्मानाबाद येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या 4 हे.गट रोपवना शेजारी स्मशान भूमीच्या कडेने वड,पिंपळ वृक्षाचे वृक्षारोपन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गट विकास अधिकारी श्रीमती दिवाणे, तहसिलदार गणेश माळी यांच्या हस्ते ही वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमास विभागीय वन अधिकारी सा श्री. ए. व्ही. बेडके व विभाग, उस्मानाबाद सहा. वरसंरक्षक सा व विभाग, पी. बी. बारसकर, वनक्षेत्रपाल दौंड व त्यांचे कर्मचारी वृंद, सरपंच श्री. विठ्ठल खैरे, माजी सरपंच श्री.अमोल मुळे, पोलीस पाटील श्री.रवि बोते, जुनोनी व ग्रामस्थ उपस्थित होते.
 सन-2020च्या पावसाळयात वृक्षारोपन मोठया प्रमाणात विविध योजनेअंतर्गत घेण्याचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी आदेशित केल्यानुसार  विभागीय वन अधिकारी श्री. ए. व्ही. बेडके यांनी सामाजिक वनीकरणाच्या विविध योजनेअंतर्गत 2020 च्या पावसाळयात करण्यात येणा-या रोपलागवड कामाबाबत माहिती दिली.
 यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी जुनोनी येथील 2019 च्या पावसाळयात लागवड केलेल्या 4 हे.गट रोपवन क्षेत्रातील 10000 हजार रोपांच्या संगोपनाची पाहणी केली असता रोपवनामध्ये सिताफळ, कांचन, जांभूळ, बेहडा, वावळा, सेमल इ. प्रजातीची लागवड केलेली आहे. रोपे 100 टक्के जिवंत असून रोपवनाचे संगोपन उत्कृष्टरित्या केल्या बद्दल भोयटे सा. व मजूर, श्री. ठवरे वनरक्षक, यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमासाठी तालुक्याचे वनक्षेत्रपाल दौंड,वनपाल गांधले यांनी अथक परिश्रम घेतले.

 
Top