उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 विविध पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने पकडून संबधित पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आे. यामध्ये उस्मानाबाद शहरातील आनंदनगर पोलिस ठाण्यात दाखल २०१८ मध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपी- समीरउद्दीन काझी उर्फ मुझम्मील, वाशी पोलिस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील कृष्णा आण्णासाहेब देशमुख, दादासाहेब उध्दव हुंबे व एक अल्पवयीन युवक, आनंदनगर पोलिस ठाण्यातील जिशान रहिम शेख, अरबाज जहांगीर शेख अशा एकूण सहा जणांना पकडून संबधित पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले. ही कारवाई एलसीबीचे पोनि शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अशिष खांडेकर व उपनिरीक्षक पी.व्ही.माने यांच्या पथकाने केली.
 
Top