लोहारा/ प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील मोघा (खु) येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत दिनांक 23 जून 2020 रोजी शेतीशाळा घेण्यात आली.
यावेळी शेतीशाळा समन्वयक डी.बी.नागरगोजे यांनी सोयाबीन उगवण क्षमता व बीजप्रक्रिया प्रात्याक्षिक सादर केले. व तसेच शेतीशाळा प्रवर्तक अजिंक्य पाटील यांनी बी.बी.एफ (रुंद वरंबा सरी) पद्धतीने सोयाबीन पेरणी बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर रमण आगळे यांनी पाच टक्के निंबोळी अर्क तयार करण्याची कृती समजावून सांगितली व मोठ्या प्रमाणात कडुनिंबाच्या निंबोळ्या गोळा कराव्यात, असे आवाहन करून पोकरा योजनेबाबत माहिती दिली. शेवटी कृषी सहाय्यक ओ.एच.पाटील यांनी हुमणी नियंत्रणाचे उपाययोजनेबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच मूलस्थानी जलसंधारणाचे जे -जे उपाय आपल्या शेतावर करता येणे शक्य आहे ते न चुकता करावेत व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबाग, गांडूळ शेड व नॅडेप पद्धतीने खतनिर्मिती आदी बाबी साठी अर्ज करावेत असे आवाहन केले.
या शेतीशाळा कार्यक्रमास सौ. सुरेखा भोंडवे, पोलीस पाटील कुंडलिक पाटील, उपसरपंच गणेश मत्ते, सचिन गोरे, उत्तम बोडगे, योगेश गोरे, बालाजी बाबळे, महादेव तडो, यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.