उमरगा/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले सागर दिलीप पवार यांनी शिक्षणाधिकारी पदाला पात्र होऊन यश संपादन केले आहे. जिद्द, चिकाटी च्या जोरावर नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या शिक्षणाधिकारी पदासाठी निवड झाली आहे. म्हणून रोटरी क्लब उमरगा यांच्यावतीने अध्यक्ष रोटरी डॉ. विनोद देवरकर, सचिव रोटरी प्रा. युसुफ मुल्ला यांच्या हस्ते सागर पवार यांचा स्वगृही सत्कार करण्यात आला. यावेळी सागरला प्रोत्साहन देणारे त्याचे आई आणि वडील यांचेही अभिनंदन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी नियमित अभ्यास, चालू घडामोडींचा चिकित्सक दृष्टीने अभ्यास करणे व त्यासोबतच निश्चित केलेल्या धेयाप्रती परिश्रम करण्याची मानसिक तयारी असेल तर यश आपल्यापर्यंत चालून येते. मी सध्या शिक्षणाधिकारी पदासाठी पात्र असलो तरी येणाऱ्या काळात अभ्यासाची तयारी चालु ठेवुन यापुढील पदासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
यावेळी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष तथा 2020 - 21 चे रोटरी वाँटर मँनेजमेंट डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉ.संजय अस्वले, क्लबचे 2020 - 21 चे सचिव अनिल मदनसुरे, उपस्थित होते.