उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 कोरोना पॉझीटिव्ह पेशेंट आढळुन आल्याने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती धनंजय सावंत यांनी आज दि.4 जून 2020 रोजी तुळजापूर तालुक्यातील नळदूर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देवून पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच. व्ही. वडगावे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुहास पवार , वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल जानराव व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी श्री. सावंत यांनी नागरीकांना कोरोनाची काळजी घेण्यासाठी तोंडावर मास्क, वारंवार हात धुने, सॅनीटाइझरचा वापर करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आदी उपाययोजना करण्याचे आवाहन केले. प्राथमिक आरोग्य केंद्रावर देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेची पाहणी करुन समाधान   व्यक्त केले.
 
Top