लोहारा/प्रतिनिधी
 माजी ग्रामविकास राज्यमंत्री तथा प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांचे नातू विराट संगमेश्वर कल्याणी यांनी गुरुवारी दि. ४ जुन रोजी मुरूम शहरातील मुख्य रस्त्यावरून गांधी चौक ते बसस्थानकापर्यंत कोरोना संसर्ग टाळण्याकरिता हिंदीतून जनजागृती केली. त्यांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्क व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन सर्व नागरिकांनी करावे, सुरक्षित अंतर ठेवावे, स्वतःहून काळजी घ्यावी असे आवाहन स्पीकरद्वारे गाडीतून करण्यात आले.
शहरातील या छोट्या बालकांने केलेले आवाहन हा कौतुकाचा विषय बनला होता. त्यांच्या आव्हानाला शहरातील नागरिकांनी प्रतिसाद दिली तर विशेष करून तरुणांनी भरभरून दाद दिली. विराट कल्याणी यांनी कोरोना संसर्गाचा फैलाव व प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी एकजुटीने मुकाबला केला पाहिजे. घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही पण सर्वांनी काळजी घ्यावी. आपल्या शहरात एकही कोरोना रुग्ण नाही ही आनंदाची व समाधानाची बाब असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
 
Top