तुळजापूर / प्रतिनिधी:
 तिर्थक्षेञ  तुळजापूर येथील महाराष्ट्रातील प्रमुख आद्यशक्ती पीठ असलेले मंदीर भाविकांनसाठी बंद असल्याने धार्मिक वृत्तीची मंडळी पंचक्रोषीतील देवदेवतांचा मंदीरात जावुन पुजा-अर्चा करीत असल्याने पंचक्रोषीतील मंदीरांनमध्ये भाविकांची रेलचल वाढली आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मंदीर गेली तीन महिन्या पासुन बंद असल्याने धार्मिक वृत्तीचा मंडळी सैरभर झाले होते. त्यामुळे यावर पर्याय म्हणून धार्मिक वृत्तीची मंडळीनी पंचक्रोषीतील शंभू महादेव, श्री गणेश,  ग्रामदैवत  तुळजाभवानी  सह  ग्रामदेवतांचा मंदीरात जावुन मनोभावे पुजाअर्चा करुन आपली धार्मिक व देवदर्शनाची भुक भागवत आहेत .
नवविवाहीत दांम्पत्य तर प्रथम श्रीतुळजाभवानी चे राजमाता जिजाऊ महाध्दार समोर दर्शन घेवुन नंतर तुळजापूर खुर्द येथील मंदिरात जावुन तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर ग्रामदैवत महादेव गणेश घाटशिळेवरील घाटशिळ मंदीर रामदरा तलावातील शंभु महादेव  मंदीराचा पायथ्याशी असणारे बारालिंगेश्वर मंदीर  राखेल जवळील येमाई मंदीर तिर्थ खुर्द मधील नागोबा भैरोबा  मंगरुळ जवळील शनी मंदीर  सह अन्य देवतांचा मंदीरा मध्ये जावुन मनोभावे दर्शन घेवुन नव्या संसारास आरंभ करीत आहेत.
कोरोना काळात मंदीरात दररोज फळे,फुले, दिव्यांचा आरास
तिर्थक्षेञ तुळजापूरच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात श्रीमुदगुलेश्वला महादेव मंदीर असुन या देवतेचा भक्तांन मध्ये युवा भक्तांची संख्या लक्षणीय आहे.
या मुदगुलेश्वर महादेव मंदीरात कोरोना काळात दररोज फुले, फळे सह अन्य सहित्यांनी मंदीर गर्भगृह सह परिसरात आकर्षक आरास केली जाते तसेच आकर्षक दिवे ही लावले जातात हे मंदीर या काळात आकर्षण केंद्र बनले आहे.
 
Top