नळदुर्ग / प्रतिनिधी
गेल्या तीन महिन्यापासून देशावर कोरोना महामारीचे संकट उभे आहे, दिवसेंदिवस हे संकट वाढतच चालले असल्याने महामारीचे हे संकट कधी कमी होईल हे सध्यातरी सांगता येणार नाही त्यामुळे आता शासनाने अर्थव्यवस्थेला चालना देत लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल केले असल्याने यापुढे आपल्याला कोरोनासोबत जगावे लागणार असून आपल्याला स्वतःची काळजी स्वतः च घ्यावी लागणार आहे, घरातून बाहेर पडताना कोरोनापासून वाचण्यासाठी शासनाने नियम ठरवून दिलेले नियम पाळायचे आहेत ज्यामध्ये मास्क वापरणे अनिवार्य आहे तसेच सॅनिटायझर चे वापर नियमित करावे असे आवाहन युवा मोर्चा वतीने केले.
नळदुर्ग शहर भाजपा युवा मोर्चा वतीने कोरोना बाबत जनजागृती करत तुळजापूर विधानसभेचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून आणि प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग शहर भाजपा युवामोर्चा शहराध्यक्ष श्रमिक पोतदार यांच्या वतीने मास्क, सॅनिटायझर आणि जनजागृतीच्या पत्रकाचे वाटप जेष्ठ पत्रकार विलास येडगे, युवा मोर्चा चे शहराध्यक्ष श्रमिक पोतदार, कैलास घाटे, सरचिटणीस विशाल डुकरे, मयूर महाबोले यांच्या हस्ते करण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून अजीम प्रेमजी यांच्या विप्रो कंपनी चे स्वदेशी बनावटीचे सॅनिटायझर खरेदी करून स्वदेशी चा तसेच व्यास नगर येथील महिलांकडून बनवले गेलेले मास्क विकत घेत गृहउद्योगला प्रोत्साहन देण्यात आले. यापूर्वी भाजप व युवा मोर्चा वतीने शहरातील नागरीकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे आर्सेनिक अल्बम ३० चे वाटप देखील करण्यात आले होते.