नळदुर्ग / प्रतिनिधी
 नळदुर्गचे सुपुत्र व तुळजापुर तालुक्याचे नेते अशोक जगदाळे यांचा दि.२७ जुन रोजी नळदुर्ग येथे वाढदिवस साजरा करण्यात आला. सध्या कोरोनाचे संकट असल्याने जगदाळे यांच्या समर्थकांनी जगदाळे यांचा वाढदिवस साध्यापणाने साजरा केला.
 वाढदिवसाचे औचित्य साधुन आरोग्य कर्मचारी, पोलिस, टपाल कार्यालय, पत्रकार, न.प.चे सफाई कर्मचारी यांना मास्क शिल्ड, आर्सेनिकम अल्बम ३० या गोळ्यावाटप करण्यात आले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्ण व येथील मरगम्मा वस्तीतील लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.तसेच  कोरोनाच्या संकटातनागरिकांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या नळदुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी, नळदुर्ग पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी, पत्रकार, न.प.चे स्वच्छता कर्मचारी, बसस्थाकतील वाहतुक नियंत्रक ज्योती दस, दीपक डुकरे, वृत्तपत्र विक्रेते भारत यादगिरे, पोस्ट ऑफिस कार्यालयातील सर्व कर्मचारी यांना जगदाळे मित्र परिवाराच्या वतीने मास्क शिल्ड व आर्सेनिकम अल्बम ३० या रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या गोळ्या आदी साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी  नगरसेवक नितीन कासार, महालिंग स्वामी, माजी नगरसेवक अमृत पुदाले,शरद बागल,शब्बीर कुरेशी, किशोर नळदुर्गकर, गणेश मोरडे,संजय विठ्ठल जाधव, सुनिल गव्हाणे, नवल जाधव, मारुती खारवे, ताजोद्दीन सावकार, इरफान जहागिरदार,प्रविण चव्हाण,शाम बागल, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, लतिफ शेख,सकल मराठा परिवाराचे राजेंद्र काशिद, अमित शेंडगे, रणजित डुकरे, ओमकार स्वामी, अंकीत मगतराव,सुशांत भालेराव, सोमनाथ मानशेट्टी, श्रीशैल स्वामी,महेश जळकोटे, सुजित बिराजदारआदीजन उपस्थित होते. या कार्यक्रमास न्यू चैतन्य तरुण गणेश मंडळ व धर्मवीर संभाजी तरुण गणेश मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top