लोहारा/प्रतिनिधी
 शहरातील नेताजी सुभाष चंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने कोविंड -19 या महाराष्ट्रात आलेल्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनानुसार मुख्यमंत्री सहायता निधीस मदत केली.
यावेळी महाविद्यालयाच्या वतीने 88 हजार 645 रुपयाचा चेक स्टेट बँक ऑफ लोहारा शाखेचे मॅनेजर सुमित्रा सिन्हा यांच्याकडे प्राचार्य श्रीमती उर्मिला पाटील यांच्या हस्ते सोपविण्यात आला. यावेळी प्रा. ज्ञानदेव शिंदे, प्रा. उध्दव सोमवंशी, भास्कर जाधव सर, श्रीमती सुलोचना रसाळ मॅडम, श्रीमती पौर्णिमा घोडके मॅडम, श्रीकांत मोरे सर, अंकुश शिंदे सर, बँकेतील सहाय्यक अनिल नरवाडे, उपस्थित होते. यावेळी मॅनेजर सुमित्रा सिन्हा यांनी सर्वांचे आभार मानले.

 
Top