उस्मानाबाद/ प्रतिनिधी
जिल्हयातील खरीप हंगामाबाबत आज आढावा बैठक घेतली आहे. त्यात जिल्हयात एकुण २२ टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये ३७ टक्के सोयाबीनची पेरणी केली आहे. सोयाबीनच्या पेरणीनंतर हजारो शेतकऱ्यांचे पीक उगवून आले नाही, या संदर्भात कृर्षी विद्यापीठ परभणी येथील  तंज्ञ समिती बियाणांची तपासणी करून योग्य ती चौकशी करेल व जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन कृर्षी मंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत देले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेत खासदार ओमराजे निंबाळकर, अामदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी दिपा मुधोल-मुंडे यांच्यासह कृर्षी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री भुसे यांनी सोयाबीनच्या बियाणाबद्दल १ हजार शेतकऱ्यांनी आपल्याकडे तक्रार केली आहे. नेमकी यामध्ये कोणाची चुक आहे, ते पाहून कारवाई करणार असल्याचे सांगून जिल्हयात १५९० कोटी रुपयांचे पिक कर्जाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी फक्त ३११ कोटी पीक कर्ज वाटप केले आहे. उर्वरीत पीक कर्ज १५ दिवसात वाटप होईल, असे त्यांनी सांगितले. महात्मा ज्योतीबा फुले कर्ज माफी योजनेत ५२ हजार शेतकऱ्यांना ३८४ कोटी रुपये कर्ज माफीचा लाभ मिळाला आहे. तर उर्वरीत ७ हजार शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ मिळेल.

 
Top