नळदुर्ग / प्रतिनिधी
शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची अडवणूक न करता खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना तात्काळ पिक कर्ज वाटप करण्यात यावे या मागणीचे निवेदन नळदुर्ग शहर भाजपाच्या वतीने येथील भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे देण्यात आले .
या निवेदनात म्हटले आहे की , खरीप हंगाम सुरू झाला आहे परंतु आध्याप हि बँकेने पीक कर्जाचे वाटप सुरू किले नाही . याच खरीप हंगामावर शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते , त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जाची अत्यंत गरज असते मात्र आध्याप ही बँकेने पीक कर्ज वाटप करण्यास सुरुवात केली नाही हि दुर्देवाची बाब आहे . शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया जावू नये म्हणून बँकेने पोरणी , बियाने व खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना विना अट पीक कर्ज वाटप करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर भाजपाचे शहराध्यक्ष पद्माकर घोडके , नगरसेवक नय्यरपाशा जहागिरदार , सुशांत भुमकर, श्रमीक पोतदार , सिराज काझी ,  जिलानी कुरेशी , विशाल डुकरे यांच्या स्वाक्षरी आहेत .
 
Top