उस्मानाबाद  / प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्ह्यातील आणखी तीन जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या आता ७६ झाली आहे.
उस्मानाबाद जिल्हयातील  ९० व्यक्तींचे स्वॅब  काल   तपासणीसाठी आले होते त्यापैकी ७५   व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले तर  २  व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते  व तीन  व्यक्तीचा  अहवाल Inconclusive आला होता तर  आणखी  दहा  अहवाल प्रलंबित होते, त्यांचे अहवाल आता आले आहेत. दहा पैकी तीन पॉजिटीव्ह आणि सात Inconclusive रिपोर्ट आला आहे. पंजिटिव्ह रुग्णामध्ये सुंभा ता. उस्मानाबाद येथील एक २३ वर्षाची महिला, दोन जण वाटेफळ ता. परंडा येथील रुग्ण आहेत. एक रुग्ण ४० वर्षाचा तर एक रुग्ण २४ वर्षांचा आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने आता तिसरा बळी घेतला आहे. शिराढोण ता.कळंब येथील एक ६४ वर्षाची महिला आज  सकाळी उस्मानाबादच्या रुग्णालयात मरण पावली. या महिलेला   तीन दिवसापूर्वी उस्मानाबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  तिला कोरोना कश्यामुळे झाला, हे अजूनही स्पष्ट झालेले  नाही. 
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण - ७६ झाले आहेत तर एकूण बरे झालेले  रुग्ण - १९ आहेत, उपचार घेत असलेले रुग्ण - ५४ तर एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - ३ तीन झाले आहेत. 
 
Top