उस्मानाबाद/प्रतिनिधी -
 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र अंतर्गत कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर ‍जिल्ह्यात मजुरांना कामे उपलब्ध करुन देण्यासाठी आज रोजी एकूण 621 ग्रामपंचायतीपैकी 510 ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरु आहेत. त्या कामांवर एकूण 1172 हजेरी पत्रके निर्गमित केली आहेत. या कामांवर एकूण 12 हजार 251 मजुरांची उपस्थिती आहे.
वरील कामांमध्ये ग्रामपंचायत अंतर्गत एकूण 910 कामे, कृषि विभागाची -95, सामाजिक वनीकरण-34, वन विभागाची-35, रेशीम विभागाची-81 व जलसंधारण विभागाच्या 17 कामाचा समावेश आहे. या कामामध्ये घरकुलाची 178 कामे, वैयक्तिक सिंचन विहिरी - 270, सार्वजनिक पाणी पुरवठा विहीर-361, तुती लागवड-82, फळबाग लागवड -69, वृक्ष लागवड -41, गाळ काढणे -30 व इतर कामे मनरेगा अंतर्गत सुरु असून जिल्ह्यामध्ये मजुरांच्या मागणी प्रमाणे मजुरांना कामे तात्काळ उपलब्ध करुन देण्याची दक्षता घेण्यात येत आहे.
 कोवीड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामावर हँड सॅनिटायझर, साबण, मास्क इत्यादी साहित्य मजुरांना उपलब्ध करुन दिले असून सामाजिक अंतर (Social Distance) चे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे.
 जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (रोहयो) विभागात मग्रारोहयो कामाबाबत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या यंत्रणेच्या कामासाठी नियंत्रक म्हणून  श्री.आर.एस.बेद्रे, नायब तहसीलदार (रोहयो) मो. क्र.7058056777 यांची नियुक्ती केली आहे. नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र.(02472-222279) असा आहे.
ग्रामपंचायत स्तरावरील कामाच्या नियंत्रकपदी श्री.अविनाश गायकवाड, सहायक लेखा अधिकारी, नरेगा सेल, जि.प. उस्मानाबाद मो.क्र.9552016701 (नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्र. 02472-220611) यांची नियुक्ती केली आहे. मग्रारोहयोच्या कामाबाबत कांही अडचणी असल्यास नागरिकांनी  संबंधित नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top