
तिर्थक्षेञ तुळजापूर येथे शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधुन शनिवार दि. 6 रोजी श्रीतुळजाभवानी मंदीराच्या मुख्य राजेशहाजी प्रवेश महाध्दारा समोर छञपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन माजी मंञी आमदार राणाजगजितसिंहपाटील यांच्या हस्ते करण्यात येवुन शिवराज्यभिषेक सोहळा देविदारी सोशल डिस्टंन्स पाळुन साजरा करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे, नागेश नाईक , आनंद कंदले, औदुंबर कदम, श्रीनाथ शिंदे आदींसह शिवप्रेमी उपस्थितीत होते.