तुळजापूर/प्रतिनिधी-
बळीराजा चेतना अभियान व नागरी दलितवस्ती सुधार योजनेतील कोट्यवधींच्या घोटाळ्यातील दोषींवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी एसटी महामंडळाचा माजी कर्मचारी तथा मनसेचे जिल्हाअध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी मुख्यमंत्री यांच्या कडे निवेदन देवुन केली आहे.
 निवेदनात म्हटलं आहे की ,उस्मानाबाद जिल्ह्यात, शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीचा कार्यक्रम राबवून त्या अंतर्गत शेतकर्यांच्या विकासासाठी व त्यांचे मनोबल उंचावून उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी आधुनिक पध्दतीने कमी खर्चात जास्त उत्पन्न घेण्याबाबत प्रशिक्षण व पुस्तके शेतकर्यांना देण्याचे ठरले.या योजनेसाठी ७ कोटी १९ लाख रुपयांची तरतूदही  करण्यात आली. परंतु यातील एक दमडीही शेतकर्यांच्या कामी आली नाही.हि रक्कम अतिशय नियोजनबद्धरित्या जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ अधिकार्यांनी संगनमताने हडप करून शासनास करोडो रुपयांचा चूना लावला आहे.
तसेच,आण्णाभाऊ साठे नागरी दलितवस्ती सुधार योजनेत सुद्धा याच महाभागांनी ९ कोटी ३५ लाख रुपयांचा घोटाळा केला आहे. या घोटाळ्यातील दोषींवर नजीकच्या पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांच्या चौकशी समितीने जिल्हाधिकार्यांना दिलेले असताना ,दोषींना वारंवार खुलासा करण्याबाबत नोटीसा दिल्या जात आहेत. व यातील वरिष्ठ अधिकार्यांना वाचविण्यासाठी, कनिष्ठ अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवून,  प्रशासकीय चालढकल करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.    सामान्य माणसाकडून गुन्हा घडल्यास कसलीही चौकशी न करता,खुलासा न मागवतात,नोटीस न देता  त्याच्यावर तात्काळ गुन्हा नोंद केला जातो.मग शासनास करोडो रुपयांचा चूना लावणाऱ्यांना,(चौकशी समितीने ठपका ठेवला असतानाही) खुलाशाच्या नोटीसा कशासाठी ? तरी उपरोक्त गंभीर प्रकरणी दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे निवेदनात म्हटलं आहे.
 
Top