उस्मानाबाद /प्रतिनिधी-
शहरातील नगरपरिषद प्रभाग क्रमांक ९ मधील निवासी वसाहतीत ०६ जून ३४६ वा छत्रपती महाराज राज्याभिषेक  दिनाचे औचित्य साधून दिनाचे औचित्य साधून निवासी वसाहतीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श कायम पुढील पिढीस स्मरणात राहावे याकरिता वसाहतीतील जनतेने वर्गणीतून प्रतिमा फलक उभा केला आहे.
 या प्रतिमा फलकाचे अनावरण कार्यक्रमासाठी निमंत्रित प्रथम नागरिक तथा नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, सुधीर पाटील, चंद्रसेन देशमुख, असून सकाळी प्रथम छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस अभिषेक करण्यात आला त्यानंतर प्रभाग ९ चे न .प. सदस्य युवराज मुळे संदीप साळुंके सौ. प्रेमा सुधीर पाटील ,इतिहास संशोधक डॉ .सतीश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत अनावरण समारंभ संपन्न होऊन कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. शामराव दहिटणकर यांनी केले छत्रपती शिवरायांच्या कार्य आदर्शबाबत मनोगत कुमारी सार्थकी शेषनाथ वाघने व्यक्त केले चित्रकार अविनाश नलावडे यांचा सर्व मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शेषनाथ वाघ , रमेश खडके, अनिल ढगे ,श्याम सुंदर भन्साळी , सुहास  घोंगडे, सतीश जाधव, डॉ.सतानंद दहिटणकर, संभाजी बागल, सागर रामभाऊ धतूरे, वेंकटेश वाकुरे सर्व वसाहत निवासी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्य हरी वाघ यांनी केले  कु. विशाखा बागल हिने आभार मानले 
 
Top