उस्मानाबाद / प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी बारा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये शिराढोण येथील तब्बल आठ रुग्ण आढळले असून ढोकी येथेही दोन रुग्ण सापडले आहेत.
आज दिनांक 05/06/2020 रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 45 samples शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सर्व रिपोर्ट प्राप्त झाले .
त्यापैकी बारा  पॉझिटिव्ह,4 inconclusive  व 29 निगेटिव आले आहेत.
पॉझिटिव पेशंटची माहिती ---
आठ  पेशंट शिराढ़ोन ता.कळंब येथील असून हे सर्व पूर्वीच्या पेशंटच्या संपर्कातील आहेत. व दोन पेशंट हासेगाव  ता. कळंब  येथील  पूर्वीच्या आंदोरा येथील पेशंटच्या संपर्कातील आहेत असे एकूण दहा पेशंट कळंब तालुक्यातील  आहेत. व दोन पेशंट ढोकी  ता  उस्मानाबाद  येथील  असून ते पुणे  रिटर्न  आहेत.
यामुळे आता उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 116 वर पोहोचली आहे. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना आढळण्याची ही पहिलीच घटना आहे.
 
Top