उस्मानाबाद/ प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने दुहेरी शतक पार केले आहे. आतापर्यंत कोरोना बाधितांचा  आकडा २०९ इतका झाला आहे. तसेच आतापर्यंत यापैकी नऊ जणांचा मृत्यू झाला आहे तर तब्बल १६६ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले आहे.
नवीन आढळलेल्या रुग्णांमध्ये दोन रुग्ण भूम तालुक्यातील ईडा गावचे असून ते पूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहेत. तर एक रुग्ण परंडा तालुक्यातील नालगाव येथील आहे. सध्या जिल्ह्यात एकूण २०९ कोरोनाबाधीत रुग्णाची नोंद झाली असून यापैकी १६६ जण डिस्जार्च घेऊन घरी परतले आहेत. ९ जणांचा मृत्यू झाला असून सध्या ३४ रुग्ण उपचार घेत आहेत.

 
Top