तेर/प्रतिनिधी-
तेरहून ढोकीच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास तेर शिवारातील घडली. या दूर्घटनेमध्ये अातमधील दोघांनी प्रसंगावधान राखत बाहेर उड्या घेतल्याने ते बालंबाल बचावले परंतु, कारचे मोठे नुकसान झाले.
याबाबत प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथून एमएच 01 एएच 4395 या क्रमांकाची काळ्या रंगाची इंडिगो कार ढोकीच्या दिशेने जात हाेती. सदरील कार तेर गावाजवळील आमराई ढाब्याजवळ पाेहचली असता धावत्या कारमधील वायरिंगचे शॉर्टसर्किट होऊन कारने पेट घेतला, गाडी पेटल्यानंतर फटाक्यांसारखा बारीक अावाजही येत हाेता.याचवेळी कारमधील दाेघांनी बाहेर उड्या घेतल्या. नागरिकांनी तातडीने धाव घेऊन पेटलेली कार विझवली. परंतु, तोपर्यंत कारचा फक्त सापळा शिल्लक राहिला होता.
 
Top