कळंब/ प्रतिनीधी
कळंब येथील तहसील कार्यालयाच्या अंतर्गत चालत असलेले सेतू सुविधा केंद्र करार संपला असल्याने दिनांक १०जून रोजी पासुन बंद करण्यात आले आहे.त्यामुळे कळंब तालुक्‍यातील नागरिकांची व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ लागली आहे.त्यामुळे मानवहीत लोकशाही पक्षाच्या वतीने येथील तहसीलदार यांना सेतु सुविधा केंद्र सुरु करण्यात यावे या बाबत निवेदनाद्वारे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटुळे यांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.
गेल्या दोन महीन्यापासून लाँकडाऊन परिस्थिती असल्यामुळे सेतु सुविधा केंद्र बंद होते, परंतु जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने गेल्या आठवढ्या भरापुर्वी सोशल डिस्टेटिंग पाळुण सेतु सुविधा केंद्र सुरु करण्याबाबत कळविले असल्याने सदरील सेतू सुविधा केंद्र सुरु करण्यात आले होते, परंतु सदरील सेतू सुविधा केंद्र दि. १०जुन रोजी पासुन बंद करण्यात आले असल्याचे सेतू सुविधा केंद्र चालक सांगत आहेत. सद्यस्थितीत शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने व नागरिकांची दोन महिन्यांपासून अडकलेली कामे प्रलंबित असल्याने आनेक प्रमाणात काढण्यासाठी गैरसोय होऊ लागली आहे.त्यामुळे सदरील सेतू सुविधा केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटुळे यांच्या वतीने व नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे
 
Top