उस्मानाबाद/ प्रतिनीधी
एखादा उद्योग करत असताना सबसिडी मिळते म्हणून उद्योग करण्यापेक्षा आपला एखादा ब्रँड तयार करण्यासाठी उद्योग करणारे लोकच भविष्यात मोठे उद्योगपती व यशस्वी होतात आणि ज्यांना उद्योग करायचा असेल त्यांनी भांडवल नाही हे कारण सांगण्यापेक्षा शून्यातून लढलं तर त्यांचा उद्योग मोठा होऊ शकतो असे प्रतिपादन उद्योगपती व रावण राजा राक्षसांचा या कादंबरीचे लेखक शरद तांदळे यांनी केले.ते धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ऑनलाइन व्याख्यानमालेत “कोरोना नंतरच्या उद्योगातील संधी” या विषयावर बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आज आपण सोशल मीडियाचा वापर सकारात्मक केला पाहिजे. कुणाला ट्रोल करण्यापेक्षा आपण सोशल मिडियाचा वापर करून आपला एखादा उद्योग निर्माण करावा व आपल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी त्याचा वापर केला तर आपला वेळ वाया जाणार नाही. 2020 मध्ये कोरोना सारखं संकट येईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. उलट 2020 मध्ये भारत हा विकसित देश व्हावा असे स्वप्न भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांनी पाहिलं होतं मात्र यावर्षी जगासमोर एक वेगळेच संकट उभा राहिल आहे. या संकटावर आपल्याला मात करावीच लागणार आहे मात्र कोरोना नंतर अनेक क्षेत्रात उद्योगाच्या संधी असतील मात्र त्यातही ‘ॲग्रीकल्चर बिजनेसला’ आता खुप महत्त्व येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी न विकता त्या पिकवल्या पाहिजेत. शेतकऱ्यांची मुलं एमपीएससीच्या तयारीसाठी पुणे-मुंबई या ठिकाणी अभ्यास करत होती मात्र त्यांना अद्यापही त्या ठिकाणी यश मिळाले नसेल त्यांनी खचून न जाता आपल्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये जगाच्या मार्केटचा अभ्यास करून वेगवेगळी पिके घ्यावीत आणि ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या अॕपचा वापर करून आपल्या वस्तू,अन्नधान्य विकावीत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
व्याख्यानाचा समारोप करताना यश मिळवण्यासाठी स्वतःला ओळखता आलं पाहिजे,आपल्या उद्योगाशी संबंधित वाचन केलं पाहिजे,त्यासोबतच आपण अपडेट राहिले पाहिजे,एक तरी कौशल्य शिकल पाहिजे आणि उद्योग करत असताना बचत केली पाहिजे या गोष्टी आपल्याला यशस्वी उद्योजकाकडे घेऊन जातात असेही त्यांनी यावेळी सांगितले.